आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांच्या निधनानंतर:गरजू विद्यार्थिनीला शिक्षणासाठी मदत ; उपक्रमाचे सर्वत्र काैतुक

भडगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर स्वत: काम करुन बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला अनेक दात्यांनी शिक्षणासाठी राेख रक्कम देवून मदत केली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.स्वतः काम करून शिक्षण घेणाऱ्या सोनाली पाटील या बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला येथील रहिवासी व कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार यांनी साेनालीच्या शिक्षणासाठी ५ हजार रुपयांची मदत केली. तर योगेश शिंपी यांनी बारावी बोर्डाची परीक्षा फी भरण्यासाठी १ हजार १०० रुपयांचा धनादेश दिला. ही रक्कम डॉ. गोकुळ पाटील यांच्या हस्ते साेनाली पाटील या विद्यार्थिनीच्या घरी जाऊन देण्यात आली.

दरम्यान, सोनाली ही शिक्षण घेत असतानाच वयाच्या आठव्या वर्षी तिच्या आईचे निधन झाले, तर दहाव्या वर्षी वडिलांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात अनाथ झालेल्या सोनालीचा वृद्ध आजी सांभाळ करत आहे. चार घरी धुणी, भांडी करुन या नात आणि आजी या दोन्ही आपला उदरनिर्वाह करत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर डॉ. पंकज पवार व योगेश शिंपी यांनी साेनालीला शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच त्यांनी मदत देखील पोहोचवली आहे. याप्रसंगी बन्सीलाल परदेशी, मधुकर पाटील, सुशील महाजन, प्रदीप बडगुजर उपस्थित होते. दरम्यान, या वेळी सर्वांनी सोनालीला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यापुढे ही मदत करण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...