आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात मेळावा:अजित पवार गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. पाटलांची माहिती

पाचोरा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार १५ रोजी जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याची सुरवात पाचोरा येथून होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील यांनी दिली.

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, भडगाव येथील शाम भोसले, हर्षल पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, रणजित पाटील उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर भडगाव रोडवरील महालपूरे मंगल कार्यालयात पाचोरा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. जिल्हाभरातील नेते दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्याचा कार्यक्रम असा
१५ रोजी औरंगाबाद येथे विमानाने आगमन , चाळीसगावमार्गे पाचोरा वाहनाने सकाळी १० वाजता येतील. संजय वाघ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, १०.३० वाजता पाचोरा महाविद्यालयातील वायसीएम इमारतीचे उद्घाटन, दुपारी एक वाजता पाचोरा महाविद्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. नंतर दुपारी दोन नंतर जळगावकडे प्रयाण, दुपारी ३ ते ५ या वेळेत जळगावात मेळावा होईल.

बातम्या आणखी आहेत...