आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, केलेल्या अनुद्गाराचा तालुका भाजपतर्फे मंगळवारी जाहीर निषेध करण्यात आला. पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन केले. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत, भाजपचे कार्यकर्ते येथील राजमाता जिजाऊ चौकामधे पोहोचले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी विचार मांडले. आंदोलनप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, अनीस केलेवाले, शहराध्यक्ष तथा नगरसेवक आतिष झाल्टे, डॉ.संजीव पाटील, रवींद्र झाल्टे, मनोज जंजाळ, बाबुराव हिवराळे, दीपक तायडे, जालमसिंग राजपूत, दीपक माळी, भिका जाधव, कैलास पालवे, देवानंद नाईक हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.