आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:धरणगावात भाजपतर्फे अजित पवार यांचा निषेध

धरणगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन भाजपतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भाजपच्या वतीने अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील म्हणाले की, स्वराज्य-रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस मरण यातना सहन केल्या, पण राजांनी हिंदू धर्म सोडला नाही. तर विरोधी पक्षनेते काहिही विचार न करता वक्तव्य करतात. त्यांचा धरणगाव भाजपतर्फे जाहीर निषेध करत असल्याचे या वेळी सांगितले.

या वेळी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, अॅड. वसंतराव भोलाणे, पुनीलाल महाजन, कमलेश तिवारी, सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, संतोष चौधरी, शरद कंखरे, ललित येवले, कडू बयस, सुनील चौधरी, मधुकर पाटील, कन्हैया रायपूरकर, सचिन पाटील, जुलाल भोई आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भडगावात घाेषणाबाजी
भडगाव | अवमानजनक वक्तव्याबद्दल भडगाव भाजपतर्फे तहसील कार्यालय चौकात अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देऊन काळ्या फिती लावून निषेध नोंदवला, तसेच तहसीलदारांना निवेदन दिले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, तालुका उपाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, शहर सरचिटणीस प्रमोद पाटील, बापू शार्दूल, प्रदीप कोळी आदींसह अनेक पदाधिकारी हजर हाेते.

बातम्या आणखी आहेत...