आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:वाणेगावात नम्रता पॅनलला सर्व जागा; विकासो निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी पॅनलचा उडवला धुव्वा

पाचोरा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाणेगाव-निंभोरी विकासोची पंचवार्षिक निवडणूक रविवारी घेण्यात आली. यात शिवसेना व राष्ट्रवादी आघाडी प्रणित नम्रता पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. भाजपा प्रणित शेतकरी पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.

नम्रता पॅनलच्या सर्वसाधारण जागांसाठी विजयी उमेदवारांमध्ये रमेश बापूराव पाटील (१४२), कैलास बाजीराव पाटील (१५६), चंदू कृष्णराव पाटील (१२२), सुधीर प्रकाश देवरे (११८), भगवान त्रंबक पाटील (१२७), नरेंद्र उत्तम पाटील (१२१), राउतराय दिगंबर नामदेव (१३३), विश्वास संतोष पाटील (११५), महिला राखीव जागांसाठी निर्मलाबाई रामधन धुमाळ (१४४), उषाबाई शांताराम पाटील (१२९), इतर मागासवर्गीय जागेसाठी नंदू पोपट पाटील (१५९), तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून रामजी परशराम राठोड व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून अभिमान सोनवणे निवडून आले. नम्रता पॅनलच्या विजयासाठी रमेश पाटील, त्रंबक हावळे, विनायक दिवटे, भगवान पाटील यांनी सहकार्य केले, विजयी उमेदवारांचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी अभिनंदन केले. भाजपा प्रणित शेतकरी पॅनलचे सोपान जगतराव देशमुख, इंदिरा माधवराव धुमाळ,अरुण माणिक पाटील, अरविंद पाटील पराभूत झाले.

बातम्या आणखी आहेत...