आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाईचा मार्ग कचरा:प्लास्टिकच्या कचऱ्यातून अमळनेर पालिका दरमहा कमावतेय 15 हजार रुपयांचे उत्पन्न; कचऱ्यात शोधला कमाईचा मार्ग

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेने कचऱ्यातून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गेल्या वर्षांपासून पालिका वेगवेगळ्या संकल्पना राबवत आहे. गेल्या वर्षांपासून दरमहा पालिकेला शहरातून संकलित होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यातून महिन्याला सुमारे १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यासोबत ओल्या कचऱ्यापासून पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर कंपोस्ट खतनिर्मिती सुरू केली आहे. पालिकेने विकसित केलेल्या खताला शासनाला हरित ब्रॅँड मिळाला आहे.

आजवर पालिकेने या खताच्या प्रत्येकी ५० किलोच्या १०० बॅग तयार केल्या आहेत. एका बॅगसाठी २५० रुपये किंमत आकारली जात आहे.गेल्या वर्षापासून कचऱ्याचे विलगीकरण करून पालिकेने कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रयोग सुरू केला. शासकीय प्रयोगशाळेतून या खताची तपासणी करुन हरित ब्रँड मिळवण्यात पालिकेला यश आले.

शहरात दररोज निघणारा कचरा
काळी पिशवी १ क्विंटल
प्लॅस्टिकचे तुकडे १ क्विंटल
चपला, इतर प्लॅस्टिक ५ क्विंटल
ओला कचरा १५ क्विंटल

गेल्यावर्षी तुंबले होते पाणी : गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. मात्र, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह प्लास्टीकमुळे तुंबल्याने निचऱ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अनेक भागातील रस्ते महिनाभर पाण्याखाली होते. मात्र, ही समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून पालिकेने प्लास्टीक कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतले आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
खताच्या १०० बॅग तयार

पालिकेच्या घनकचरा प्रकल्पात ओला व सुका कचऱ्याचे विलगीरण होते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे. तर प्लास्टीक कचरा भंगार व्यावसायिकाला दिला जातो. ओल्या कचऱ्यापासून ४५ दिवसात सुमारे सात टन कंपोस्ट खतनिर्मिती करण्याचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत पालिकेने दोन ट्रक कंपोस्ट निर्माण केले आहे. त्यापैकी ५० किलोच्या १०० बॅग तयार केल्या आहेत.

प्लास्टिकच्या कचऱ्याची अशी होते विल्हेवाट
प्रत्येक अमळनेरकर दर महिन्याला सुमारे एक किलो प्लास्टीकचा कचरा बाहेर टाकतो. तर शहरात दररोज सुमारे तीन ते चार टन कचरा संकलित केला जातो. यापुर्वी कचऱ्यात जाणारे निम्मे प्लास्टीक गटारी व नाल्यांमध्ये गडप होत असे. परंतु वसुंधरा अभियानात पालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केल्यानंतर प्लास्टीकची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. घराघरातून संकलित होणाऱ्या प्लास्टीकमध्ये चपला, बुट, टाकाऊ खेळणी, प्लास्टीकची फुटकी भांडी, बाटल्या अशा कचऱ्याचा समावेश असतो. हा कचरा वेगळा करून तो भंगार व्यावसायिकाला दिला जातो. अशाप्रकारे पालिकेला कचऱ्यातून उत्पन्न मिळते. तर पुनर्पक्रिया करून हे प्लास्टीक पुन्हा वापरात आणले जाते. दररोज संकलित होणाऱ्या ओल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत निर्मिती प्लास्टिक कचऱ्याचे विलगीकरण करून भंगारात केली जाते विक्री
दिव्य मराठी विशेष
शेतकऱ्यांना ३ रुपये किलो दराने खत
पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून खतनिर्मिती सुरू केली अाहे. दुभाजकातील झाडांना हे खत दिले जात होते. शासकीय प्रयोगशाळेत खतातील घटकांची चाचणी केले असून त्याला महाराष्ट्र शासनाचे नामांकन प्राप्त झाले आहे. ५ रुपये किलोप्रमाणे ५० किलोची खताची बॅग उपलब्ध आहे. तसेच टनावर खरेदी केल्यास शेतकऱ्यांना ३ रुपये किलो दराने खत दिले जाईल. आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. - प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी
पालिकेने तयार केले कंपोस्ट खत.

बातम्या आणखी आहेत...