आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पालिकेला आमदार निधीतून दोन शववाहिन्या उपलब्ध झाल्या आहेत. सोमवारी दोन्ही वाहनांचे लोकार्पण झाले. सोमवारी सकाळी १० वाजता नगरपालिका कार्यालयात आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. आमदारांनी दोन्ही वाहनांच्या चाव्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवल्या. शहराची लोकसंख्या पाहता एकच स्वर्गरथाची सुविधी तोकडी ठरत होती.
यामुळे एकाच दिवसात अनेक अंत्यविधींची गरज भासल्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे दुखद प्रसंगात मृताच्या नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत होते. म्हणून आमदार अनिल पाटील यांनी दोन शववाहिन्या उपलब्ध करुन दिल्या. या वाहनांच्या लोकार्पणाला माजी जि.प सदस्या जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, कार्याध्यक्ष विनोद कदम, प्रा.अशोक पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.