आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनर्थ टळला:अमळनेर पं. स. आवारात ग्रामरोजगार सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

अमळनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने झाडी येथील ग्रामरोजगार सेवकाने, गुरुवारी सकाळी पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. सीआरपीसी १४९ प्रमाणे त्याला नोटीस दिली आहे.

झाडी येथील ग्रामरोजगार सेवक संदीप भावराव पाटील याला काही महिन्यांपूर्वी, ग्रामपंचायतीने पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले होते. त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने गुरुवारी सकाळी पंचायत समिती आवारात त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...