आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा संकुल:अमळनेर क्रीडा संकुल हरवले झुडपांत

अमळनेर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ, मारवड रस्त्यावर असलेले तालुका क्रीडा संकुल काटेरी झुडुपांच्या विळख्यात अडकले आहे. ५५ लाख रुपयांचा निधी खर्चून उभारलेल्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

आतापर्यंत क्रीडा संकुलावर ५५ लाखांचा, तर मल्टीपर्पज हॉलसाठी २५ लाखांचा निधी खर्च झाला आहे. मात्र, मल्टीपर्पज हॉल झुडुपात हरवला आहे.

अधिकाऱ्यांना सूचना देणार... क्रीडा संकुलात वाढलेल्या बाभळीच्या झाडांबाबत संबंधित क्रीडा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून साफसफाई कोली जाईल. तसेच संकुलाच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. - अनिल पाटील, आमदार

बातम्या आणखी आहेत...