आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंडी वाढली:अमळनेरात प्रवाशांची पळवापळवी; बसस्थानकासमोर खासगी वाहनांचा वावर

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला आहे. थेट बसस्थानकासमोर वाहने उभी करून प्रवाशांची पळवापळवी केली जात आहे. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.

बस स्थानकापासून २०० मीटर अंतरात कोणतेही खासगी प्रवासी उभी करू नये असे आदेश आहेत. मात्र, आदेश डावलून बसस्थानकासमोर खासगी प्रवासी वाहने उभी केली जातात. तसेच खासगी वाहने रहदारीच्या मार्गातच उभी केली जात असल्याने, अपघाताची भीती वाढली आहे. वाहतूक शाखेने समस्या सोडवावी.

धुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी वाढली
बसस्थानक परिसरासह भागवत रोड, दत्त हौसिंग सोसायटी, कोंबडी बाजार, डी.आर. कन्या शाळा आदी वर्दळीच्या भागाची वाहतूक कोंडी वाढली आहे. विविध ठिकाणी खासगी वाहने अवैधपणे पार्किंग केले जातात. खासगी वाहनांसाठी थांब्यांची जागा नेमून दिली आहे. तरीही वाहनचालक अमळनेर-धुळे रस्त्यावर येऊन एसटीचे प्रवासी पळवतात.

बातम्या आणखी आहेत...