आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथोत्सवाचा जल्लोष:दोन वर्षांनी अमळनेरच्या रथोत्सवाचा जल्लोष; लालजी महाराजांचा रथ रात्री 8 वाजता शांततेत मार्गस्थ; रात्री 12 वाजता सराफ बाजारात होता रथ

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशातील शेवटची यात्रा असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालजींच्या रथाची गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वाडी संस्थानमधून भव्य मिरवणूक निघाली. ठरवलेल्या मार्गानुसार रथ मिरवणूक मार्गक्रमण पूर्ण करून पहाटे परत संस्थानात दाखल होईल. दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षांपासून पाच पावले ओढून रथोत्सव साजरा केला जात होता. यंदा कोरोना कमी झाल्याने भाविकांची मेठी गर्दी झाली होती.

अमळनेर येथील येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालाजींच्या रथाची भव्य मिरवणूक निघते. संपूर्ण खान्देशातील आकर्षण असलेला हा रथोत्सव शांततेत पार पडला. लालजी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती या रथात सामावालेली होती. अक्षय तृतीयेपासून संत सखाराम सखाराम महाराजांच्या यात्रेला उत्साहात सुरु झाली आहे. विविध कार्यक्रम साजरे होत असताना गुरूवारी सायंकाळी रथोत्सव साजरा करण्यात आला.

साडेसात वाजता जयदेव व सख्याहरी यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर रथाची पूजा करून विधिवतपणे मूर्त्या विराजमान करण्यात आल्या. रथावर बसण्याचा मान ब्रम्हे व वैद्य पुजारी यांना मिळाला. भेर व तुतारीच्या निनादात सवाद्य संस्थानातील मंदिराजवळून रात्री ८ वाजेच्या सुमारास रथाची मिरवणुकीस सुरुवात झाली. रथाच्या पुढे भगवे ध्वजधारक दोन घोडेस्वार होते. त्यांच्यापाठोपाठ वारकरी व नगारे होते. सोबतच अब्दागिरी-धारक सेवेकरी व मशाल-धारी सेवेकरी होते. लेझीम मंडळाचे जल्लोषपूर्ण नृत्य, रथाच्या मागे लहान गाड्यावर महाराजांच्या चांदीच्या पादुका व मुखवटा ठेवला होता. रस्त्यावर दुतर्फा भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरेचा प्रसाद देण्यात आला. रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाद महाराजांसह रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी आरत्याही झाल्या.

रथोत्सवास यांची होती उपस्थिती ... या वेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, पालिकेचे अभियंता डिंगबर वाघ, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, नगरसेवक प्रवीण पाठक, भाजपचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे, नगरसेवक राजेश पाटील, नरेंद्र संदानशिव, नीलेश भांडारकर, महेश कोठावदे, प्रभाकर वाणी, किरण गोसावी, अनिल महाजन, सुनील भामरे, संजय पाटील, मनोज भांडारकर, अॅड. केदार ब्रह्मे, डॉ. मिलिंद वैद्य, बंडू देशमुख, सूरज परदेशी, उदय देशपांडे, प्रवीण जैन, बाळू पाटील, दिनेश सोनवणे, गणेश महाजन, उदय देशपांडे, मुख्तार खाटीक, जितेंद्र जोगी, अभिजित भांडारकर, विश्वस्त रवींद्र देशमुख, दिलीप देशमुख यांच्यासह भाविक उपस्थित होते.

पहिली मोगरी मुस्लीम बांधवाची ... रथाला पहिली मोगरी मुस्लिम बांधव लावतात. त्यानुसार रथास सलीमोद्दीन कमरोद्दीन बेलदार यांच्या हस्ते पहिली मोगरी लावून रथाची हालचाल करण्यात आली. त्यानंतर देशमुख, पाटील, धनगर समजाला रथ सुरक्षित आणण्याची जबाबदारी असते. समाधीजवळ मंडप उभारण्याचा मान माळी समजाला असतो. तर पालखीचे मेने वाहण्याचा मान भोई समजाला असतो. यात्रोत्सवामुळे यात्रा परिसर आज सायंकाळी गजबजणार आहे. सायंकाळी शहर व ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाच्या भाविकांनी हजर राहून लालजींचे दर्शन घेतले. आद्य सखाराम महाराज यांच्या पादुकांना श्रद्धेने स्पर्श करून भाविक नतमस्तक होतात. मोहन महाराज बेलापूरकर यांचे आगमन झाल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात होते.

बातम्या आणखी आहेत...