आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रमाचे कौतुक:श्रींच्या आरतीचा तृतीयपंथींना मान एकदंत गणेश मंडळाचा उपक्रम

चाळीसगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एकदंत गणेशोत्सव मंडळाने देखील एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील तृतीयपंथीयांकडून यावेळी गणेशाची आरती करण्यात आली. ‘श्रीं’च्या आरतीचा मान मिळाल्याने त्यांनी देखील आनंद व्यक्त केला.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, शहर पोलिस निरीक्षक के.के. पाटील, एकदंत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, किशोर रणधीर, माजी नगरसेवक भास्कर पाटील, राजेंद्र गवळी, आनंद खरात, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, स्वप्नील मोरे, संदीप गवळी, राहुल पाटील, कपिल पाटील आदी उपस्थित होते.

तृतीयपंथीयांचे प्रश्न मार्गी लावू यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणार्थ राष्ट्रीय पोर्टल तयार केले असून त्या माध्यमातून त्यांचे कल्याण व संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या विचाराच्या प्रेरणेतून येथील एकदंत गणेशाच्या आरतीचा मान शहरातील तृतीयपंथीयांना देण्यात आला होता. निसर्गाने जरी त्यांना वेगळेपण दिले असले तरी देवाजवळ कुणीच वेगळा नसतो, हा संदेश या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न होता, असे ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात तृतीयपंथीयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...