आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:चिंचपुरा येथील प्रौढानेघरात घेतला गळफास

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचपुरा येथील ४० वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दि. ६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गजानन वामन पाटील असे मृताचे नाव आहे. ते रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक करून उदरनिर्वाह चालवत होते. ६ रोजी पहाटे कुटुंबिय बाजूच्या खोलीत झोपले होते. त्याचवेळी पाटील यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मृत घोषित केले. पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...