आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:प्रेम विवाह केल्याच्या रागातून मेहूणबारे गावात प्रौढाची हत्या

चाळीसगाव /मेहुणबारे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मेहुणबारे येथे शुक्रवारी सकाळी घडली. दगडू वामन खैरनार (गढरी, वय ५३) असे मृत प्राैढाचे नाव असून पोलिस संशयित आरोपी भावाचा शोध घेत आहेत.मेहुणबारे येथील रहिवासी व सध्या तिरपोेळे येथे वास्तव्यास असलेले दगडू खैरनार यांचा मुलगा

तपासासाठी तीन पथके रवाना
मेहूणबारे येथील संशयित सचिन राजेंद्र चव्हाण याने बहिणीच्या प्रेमविवाहाच्या कारणावरून रागाच्या भरात दगडू खैरनार यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून जीवे ठार केल्याप्रकरणी दीपक दगा गढरी (रा. मेहूणबारे) यांच्या फिर्यादीवरून सचिन चव्हाण याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड करत आहेत. दरम्यान, घटना घटल्यानंतर संशयित आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना केल्याची माहिती तपास अधिकारी आव्हाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...