आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम चोरीचा प्रयत्न:चाळीसगावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

चाळीसगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गजबजलेल्या रेल्वे स्टेशन रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम रविवारी पहाटे फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. घटना कळताच शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही तासातच चाेरट्यास अटक करणाऱ्या शहर पाेलिसांच्या कामगिरीचे काैतुक हाेत आहे.

शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाजुलाच याच बँकेचे एटीएम आहे. २ रोजी पहाटे ५ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील अंगात काळसर रंगाचे हापबाहीचे टि-शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅण्ट घातलेल्या तरुणाने या एटीएम रूममध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. त्याने एटीएम मशिनचे लॉक तोडून मशिनमध्ये ठेवलेली रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायरन वाजल्याने चोरट्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने चोरटा तेथून पसार झाला.

या प्रकरणी सेंट्रल बँकेचे प्रताप बबनराव खेमनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. शहरातील स्टेशन रस्त्यावरील बँकेचे एटीएम फोडल्याची माहीती मिळताच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक मुकेश पाटील, अशोक मोरे, भूषण पाटील, ज्ञानेश्वर गीते, नीलेश पाटील व दीपक पाटील यांच्या पथकाने एटीएम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. त्यात एक तरुण एटीएममध्ये येताना दिसला हाेता. दरम्यान, ३१ डिसेंबरला वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने रात्री उशिरा ८ वाजेपर्यंत बँकेचे कामकाज सुरू होते.

संशयिताची न्यायालयीन काेठडीत केली रवानगी
सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिस पथक तपास करत असतानाच संशयित शहरातील संजय गांधी नगरमधील युवराज विनोद साळुंखे (वय २३) हा हिरापूर रोड परिसरात दुध सागर मार्ग भागात संशयित रित्या फिरताना आढळून आला. एटीएम फोडल्याच्या काही तासातच पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक केली. त्यास चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेचा तपास पोलिस नाईक मुकेश पाटील करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...