आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बाहेरपुरा येथील रहिवाशी वसीम खान गुलाब खान यांचे घराचे वीज बिल गेल्या दोन महिन्यांपासून थकीत आहे. तर शहरातील वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण वंजारी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार या थकीत वीज बिल ग्राहकांचे वीज कनेक्शन १५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता बंद केले. या गाेष्टीचा राग आल्याने वसीम यांचा मुलगा गुलाब खान अहमद खान याने कर्मचारी प्रवीण वंजारी यांच्याशी वाद घातला.

प्रवीण वंजारी यांनी समर्पक उत्तर दिल्यानंतर ही वसीम खान याने त्यांना मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कर्मचारी प्रवीण वंजारी यांच्या फिर्यादीवरून मारहाण, ठार मारण्याची धमकी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नाेंद आहे.

बातम्या आणखी आहेत...