आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:ऊसतोड मजुरांच्या मुलांना‎ दिला आनंदाचा फराळ‎

चाळीसगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटाची खळगी भरण्यासाठी‎ ऊसतोडणीच्या निमित्ताने गावोगावी‎ भटकंती करणाऱ्या ऊस कामगारांचे‎ हातावरच जगणे खरे तर कष्टाचे‎ आणि जिकिरीचे असते. ऊसतोड‎ करून इतरांच्या जीवनात साखर‎ रुपी गोडवा आणणाऱ्या‎ कामगारांच्या नशिबी मात्र ना दसरा‎ ना दिवाळी! त्यातच महागाईच्या‎ चटक्याने होरपळल्याने मजुरांसोबत‎ असलेल्या तांड्यातील आपल्या‎ चिमुकल्या जिवांना दिवाळीला‎ गोडधोड देण्याची इच्छा असूनही‎ परिस्थितीमुळे देणे शक्य हाेत नाही.‎

अशा वेळी वाघडू येथील नाभिक‎ समाजाचे प्रवीण अहिरे यांनी या‎ चिमुकल्यांसाठी दिवाळीचा गोड‎ फराळ देऊन, त्यांच्या चेहऱ्यावर‎ हास्य फुलवले. त्यांच्या या‎ उपक्रमाचे कौतुक होत आहे.‎ ऊसताेड मजूर पाच महिने बाहेर‎ गावीच राहतात. त्यांची लहान‎ मुलेही त्यांच्यासोबत असतात. पाच‎ महिने ऊस तोड करायची व त्या‎ मिळालेल्या मजुरीतून वर्षभर हे‎ मजूर प्रपंच भागवतात.

वाघडू येथे‎ मोठ्या संख्येने ऊस तोड मजूर‎ बाहेर गावाहून आले आहेत. यावेळी‎ संत सेना बहुउद्देशीय संस्थेचे‎ अध्यक्ष श्यामकांत अहिरे,‎ आबासाहेब गायकवाड, राजेंद्र‎ अहिरे, कृष्णा वाघ, ज्ञानेश्वर‎ अहिरे, अंकुश गायकवाड, माधव‎ अहिरे, देवराम गायकवाड, दिनेश‎ अहिरे, इंदल गायकवाड, पुष्पराज‎ अहिरे, सुनील पवार, मंगेश अहिरे,‎ चंद्रभान गायकवाड, गणेश कदम,‎ विनोद सोनवणे, शरद अहिरे, संगम‎ गांगुर्डे, सीताराम सोनवणे, बेलगंगा‎ साखर कारखान्याचे मुकादम विजय‎ पाटील व कर्मचारी उपस्थित होते.‎ मुलांमध्ये अानंदाचे वातावरण हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...