आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चाळीसगावात विमा प्रतिनिधींचे आंदाेलन

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय विमा प्रतिनिधी संघटनेच्या आदेशानुसार विमाधारकांच्या हितासाठी तसेच विमा प्रतिनिधींच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्व विमा प्रतिनिधींनी १ तारखेपासून दीर्घ आंदोलन सुरू केले असून त्या आंदोलनाच्या प्रथम टप्प्यात ५ सप्टेंबर राेजी एक दिवसाचे संपूर्ण आराम व धरणे आंदोलन करण्यात आले. चाळीसगाव येथील शाखा संघटनांद्वारे आयआरडीए, केंद्र शासन व एलआयसीच्या विरोधात हे आंदाेलन करण्यात आले.

या वेळी विमा प्रतिनिधी संघटने(लियाफी)ने आपल्या मागण्या मांडल्या. पॉलिसी धारकांना बोनस वाढला पाहिजे, कर्जाचे व लेट फीचे व्याजदर कमी करणे, विमा हप्त्यावरील जीएसटी मागे घेणे, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युईटीमध्ये वाढ करणे, विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळाला पाहिजे, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून देणे, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी लियाफी संघटना शाखेचे सर्व सदस्य व विमा प्रतिनिधींनी आंदाेलनात सहभाग घेतला हाेता. या आंदोलनाला विकास अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान यापुढील प्रत्येक आंदाेलनात माेठ्या प्रमाणात प्रतिनिधींचा सहभाग वाढणार असल्याचे सांगण्यात आले

बातम्या आणखी आहेत...