आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:अंजली व स्वाती पावरा यांच्या गणितीय क्रिया उपकरणास मिळाले प्रथम बक्षीस

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हातेड येथील स्वर्गीय नानासाहेब उत्तम पाटील माध्यमिक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अकुलखेडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केले.माध्यमिक गटातून बारावीतील आरती ठाणसिंग पावरा व मीना सुरेश पावरा यांच्या “बहुउद्देशीय चूल’ या उपकरणास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तसेच या उपकरणाची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

त्यांना माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हातेड बुद्रुक येथील अनुसूचित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील आठवीची अंजली कीर्तन पावरा व सातवीतील स्वाती कीर्तन पावरा यांच्या “गणितीय क्रिया’ या उपकरणास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राथमिक शिक्षक एन. डी. धनगर, जितेंद्र सोनवणे, गंगाराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थी, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सचिव मीनाक्षी सोनवणे, सागर सोनवणे यांच्या सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...