आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडीपार:शेंदुर्णीत आणखी 37 जणांना तडीपार नोटीस

शेंदुर्णी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणावाराच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस अधीक्षकांनी दोन दिवसांपुर्वी शहरातील १८ जणांना सहा महिन्यांसाठी तडीपारीचा नोटीस बजावली होती. त्यानंतर गणपती विसर्जनाचा काळ म्हणजेच ८, ९ व १० रोजी आणखी ३७ जणांना शेंदुर्णी परिसरातून तडीपार करण्यात आले आहे.

यासाठी पहूर पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. शेंदुर्णी येथील ३७ जणांना विसर्जन काळात शेंदुर्णी व परिसरात राहता येणार नसल्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, शेंदुर्णी आऊट पोस्ट प्रमुख यांनी कळवले आहे. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे खळबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...