आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा ७५व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यात येतो आहे. ‘अमृत कालच्या काळातील भारत @ 2047ची झलक’ या संदर्भात, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत्त संस्था नेहरू युवा केंद्र संघटन १ एप्रिल ते ३१ मे २०१३ या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यात समुदाय आधारित संस्थांमार्फत ‘युवा संवाद-भारत @ 2047’ या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाईल. ज्यात तज्ज्ञ / जाणकार व्यक्ती असतील. पंचप्राणवर चर्चा करतील. किमान ५०० तरुणांच्या सहभागासह प्रश्नोत्तरे हे एक सत्र होईल.
आयोजक समुदायास २० हजार रुपयांपर्यंत प्रतिपूर्ती केली जाईल. समुदाय गैर-राजकीय, पक्षपाती नसलेला इतिहास असणे आवश्यक आहे. युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे संघटनात्मक बळ असायला हवे. संस्था विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तीन समुदाय निवडले जातील. निकष पूर्ण करणारे समुदाय हे नेहरू युवा केंद्र जळगाव (महाराष्ट्र) पत्ता-गट क्रमांक ४०, प्लॉट क्रमांक ६०, द्रौपदीनगर, जळगाव, पिन ४२५००१ येथून प्राप्त विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च आहे. दिलेल्या मुदतीतच अर्ज पाठवावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.