आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:पहूर पेठ सोसायटीच्या चेअरमनपदी साहेबराव देशमुख यांची नियुक्ती

पहूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पहूर ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजप प्रणीत शेतकरी पॅनलला १३ पैकी दहा जागांवर विजय मिळाला. आज चेअरमनपदी साहेबराव देशमुख तर व्हाइस चेअरमनपदी रवींद्र बारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी शेतकरी पॅनलचे प्रमुख राजधर पांढरे, बाजार समिती सभापती संजय देशमुख, ललित लोढा आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात चेअरमन पदासाठी साहेबराव देशमुख यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी रवींद्र बारी यांचा एकमेव अर्ज आल्याने डी. व्ही. पाटील यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. या वेळी नवनिर्वाचित संचालक रामेश्वर पाटील, अरुण घोलप, अभय पांढरे, गोकुळ कुमावत, किरण खैरनार, भास्कर पाटील, श्याम सावळे, शरद पांढरे, राजेश जैन, संध्या पाटील, सुशीलाबाई देशमुख आदी उपस्थित होते. या प्रसंगी माजी चेअरमन किरण खैरनार यांनी नवनिर्वाचित चेअरमन साहेबराव देशमुख यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...