आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दुष्काळग्रस्त भरतीत नियुक्ती द्यावी

पारोळा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे या भरतीला स्थगिती मिळाली होती. ही भरती युतीच्या सरकारने काढली होती. परंतु चार वर्षे उलटूनही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. सध्या महामंडळात कंत्राटी पद्धतीने चालक भरती करून उमेदवारांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे २०१९ मधील दुष्काळग्रस्त भरतीतील पात्र उमेदावारांना नियुक्ती मिळावी, अशी मागणी ३४ पात्र उमेदवारांनी केली. यासंदर्भात आमदार चिमणराव पाटील यांना निवेदन दिले.

निवेदन देताना प्रविणसिंग गिरासे सचिन बागुल, योगेंद्र पाटील, सागर पाटील, दिनकर पाटील, राहुल करंदीकर, विशाल पाटील, ओमप्रकाश सुर्यवंशी विकास पवार आदी उपस्थित होते. युती शासनाच्या काळात राबवण्यात आलेली भरती प्रक्रिया, दुष्काळग्रस्तांना दिलासा ठरणार होती. मात्र, नंतर कोरोनाचा काळ आल्यामुळे दोन वर्षांपासून पात्र ठरलेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने त्वरीत पात्र उमेदवारांना नियुक्ती देऊन, त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...