आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदामाचे लोकार्पण:राज्यात 22 हजार गावांसाठी पाणी याेजनांना मंजुरी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मी मंत्री असताना तब्बल २२ हजार गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर भडगाव शेतकरी संघाचे काम खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी कर्ज फेडून २ लाख नफा कमावला. प्रतापराव पाटील व संचालकांचे काम उत्तम असल्याने आगामी निवडणुक बिनविरोध करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

शेतकरी सहकारी संघाच्या तालुक्यातील कोळगाव येथील गोदामाच्या लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार किशोर पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक मेहताबसिंग नाईक, माजी संचालक नानासाहेब देशमुख, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डाॅ. विशाल पाटील, युवराज पाटील, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक भय्यासाहेब पाटील, नगराज पाटील, जयंत पाटील, श्रावण लिंडायत, रमेश पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...