आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह भाषण:युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध एरंडोल पोलिसांत गुन्हा

एरंडोल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ २ नोव्हेंबर रोजी जाहीर सभेत युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी महाप्रबोधन यात्रेदरम्यान आक्षेपार्ह भाषण केले हाेते. या सभेत शरद कोळी यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य करून शिवराळ भाषा वापरली हाेती.

या प्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख रवींद्र भिमसिंग जाधव, उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व शालिग्राम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शरद कोळी यांच्याविरुद्ध कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करताना शहरप्रमुख आनंदा चौधरी, संभाजी पाटील, शहर संघटक मयूर महाजन, कृष्णा ओतारी, चिंतामण पाटील, विठ्ठल आंधळे, चंदनसिंग जोहरी, प्रवराज पाटील, विजय सोनार, दुर्गेश माळी, शंतनू भेलसेकर, गणेश राजपूत, दत्तराज वाघ, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...