आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकार परदेशातून कापसाच्या गाठी आयात करत असल्याने स्थानिक बाजारपेठेत कापसाचे भाव कमी झाले आहेत. या शिवाय शासन सोयाबीन व तूरही आयात करत असून ती त्वरित थांबवावी, गायरान अतिक्रमण नियमित करा, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमाेर नेत्या वैशाली सूर्यवंशी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदाेलन करण्यात अाले. खान्देशात कापसाचे प्रमुख पीक असून त्यासही योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कापूस विकण्यास धजावत नाही. यामुळे उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते व औषधी यांची देणी फेडण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावला आहे. शेतकरी चहुबाजूने भरडला जात आहे. शेतकऱ्यांशी संबंधित विविध धरणे आंदाेलनास बसलेल्या वैशाली सूर्यवंशी, दीपक राजपूत, उद्धव मराठे, शरद पाटील, अरुण पाटील व कार्यकर्ते.
मागण्यांसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख रमेश बाफना यांच्या नेतृत्वाखाली हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. येथील तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख अनिल सावंत, अॅड.दीपक पाटील, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, फईम शेख, देविदास पाटील, बापू पाटील, नीलेश गवळी, खंडू सोनवणे, माजी नगरसेवक दत्ता जडे, धर्मेंद्र चौधरी, सुनील डांबले, ज्ञानेश्वर चौधरी, प्रेमचंद पाटील, अण्णा परदेशी, रमेश पाटील, धरमसिंग पाटील, पप्पू जाधव, माजी जि.प. सदस्य राजेंद्र पाटील, तिलोत्तमा मौर्य, मंदाकिनी पारोचे, जयश्री येवले, अनिता पाटील, कुंदन पांड्या, जितेंद्र जैन, रितेश जैन, राजेंद्र राणा, शांताराम माळी, छोटूसिंग पाटील यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी टाेपल्यांमध्ये कापूस ठेवला हाेता.
या मागण्यांसाठी झाले आंदाेलन कापसाला १० हजार तर सोयाबीन तूर व सूर्यफुलाला ८ हजार रुपये भाव मिळावा, शेतीला २४ तास वीज द्या, शेती पंपाची मागील वसुली माफ करा, गायरान अतिक्रमण नियमित करा, पाचोरा व भडगाव तालुक्यांचा पोखरा योजनेत समावेश करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदाेलन करण्यात आले. शेतकरी माेठ्या अडचणीत असून शासनाने मदत करावी,अशी मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.