आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांनी इंदोर:डंपर चाेरी प्रकरणी आराेपी गजाआड

चाळीसगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षापूर्वी महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर वाळूसह जप्त करून पोलिस ग्राउंडमध्ये उभे केले होते. हे डंपर चाेरुन नेणाऱ्या मध्य प्रदेशातील सेंधवा येथील भामट्यास शहर पाेलिसांनी इंदोर येथून शिताफीने अटक केली आहे.

महसूल विभागाने सन २०२०मध्ये वाळूचे डंपर पकडले होते. हे डंपर पोलिस कवायत मैदानात लावले होते. ते मध्य प्रदेशातील डंपर संशयित फिरोज शेख उर्फ भुरू सलीम शेख (वय ३३, रा. सेंधवा, हल्ली मु. इंदोर) याने पळवले होते. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल होता. तेव्हापासून फिरोज शेख पसार होता. संशयित इंदूर येथे असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाल्यावर पोलिस पथकाने २९ जुलैला इंदूर गाठले. २ दिवस पाळत ठेवल्यावर ३० जुलैला संशयित फिरोज शेख पोलिसांच्या हाती लागला. त्यास अटक करून चाळीसगावात आणले असून तपास भूषण पाटील करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...