आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगमन:बाेरखेडा येथील शाहे दिलावर बाबा दर्ग्यावर काठीचे आगमन

चाळीसगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच असलेल्या बोरखेडा बुद्रुक येथील शाहे दिलावर बाबांच्या दर्ग्यावर जातेगाव येथून बोरखेडा बुद्रुक येथील तरुणांनी व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने पायी काठी आणली.

जातेगाव ते बोरखेडा हे अंतर जवळपास ८५ किलोमीटर एवढे आहे. ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता मोठ्या उत्साहात काठी घेण्यासाठी गेलेले तरुण त्याचदिवशी रात्री १० वाजता बोरखेडा गावात परतले. या वेळी तरुणांची हिंदू-मुस्लिम एकता दिसून आली. दरम्यान, बोरखेडा बुद्रुक पिराचे हे गाव चाळीसगाव शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे.

या दर्ग्याची ४५० वर्षांपूर्वीची स्थापना झाली असून गावातील नागरिकांची येथे माेठी श्रद्धा आहे. मुस्लिम धर्माचा हा पाचवा खलिफा आहे. बांबुची १११ फूट उंचीची काठी तोडून ती जमिनीवर न ठेवता खांद्यावर धरून ती बोरखेडा बुद्रुक येथील दर्ग्यावर आणली जाते. ही काठी बोरखेडा येथील दर्ग्यावर आणून तिचे पूजन करून ती जानेवारी महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला बाहेर काढून संपूर्ण गावात ढोल-ताशांच्या गजराने तिची मिरवणूक काढली जाईल. चतुर्थीला बोरखेडा येथे मोठी यात्रा भरवते. सुमारे २०० वर्षांपूर्वीपासून या यात्रेची परंपरा असल्याचे ग्रामस्थांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

पूजेला यांची उपस्थिती
बोरखेडा गावाचे आराध्य दैवत शाहे दिलावर बाबा यांच्या काठी आगमन सोहळ्यास राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची उपस्थिती हाेती. त्यांनी शाहे दिलावर बाबा यांच्या काठीचे दर्शन घेतले. या वेळी माजी आमदार राजीव देशमुख, रोहिणी खडसे खेवलकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी संचालक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...