आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यापेक्षा गटार:रस्त्यापेक्षा गटार तीन फूट उंच असल्याने मार्गावर साचले पाणी

शेंदुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेंदुर्णी ते साेयगाव मार्गावर जवळपास १ किलाेमीटरची गटार बांधण्यात आली आहे. रस्त्यापेक्षा ३ फुट उंच गटार बांधल्याने सध्या या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प हाेत आहे.

शेंदुर्णी ते सोयगाव मार्गावर गेल्या तीन वर्षापासून जामनेर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातर्फे गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, नियोजनाअभावी हे काम कोलमडले आहे. रस्त्यापेक्षा गटार जवळपास ३ फूट उंच झाल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी या गटारीत जात नाही. परिणामी या रस्त्यावर पाणी साचते, यामुळे सोयगाव ते शेंदुर्णी मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षापूर्वी जामनेर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने शेंदुर्णीत एक किलोमीटर अंतरावरील गटारीचे काम हाती घेतले हाेते. परंतु, आजपर्यंत हे काम पूर्ण करण्यात या विभागाला यश आलेले नाही. दरम्यान, याच ठिकाणी पूर्वी रस्त्यापासून ३ फूट खाली गटार बांधण्यात आली हाेती. या गटारीत दगड, माती गेल्याने ही गटार बंद झाली हाेती.

त्यानंतर याच गटारीला पुन्हा आणखी ३ फूट वर उचलण्यात आली. तर या गटारीचे बांधकाम नियोजन अभावी तसेच तंत्रशुद्ध पद्धतीने न झाल्यामुळे गटार रस्त्यापासून ३ फूट उंच झाली. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरील पाणी गटारीत न जात ते रस्त्यावरच साचते, यामुळे सोयगाव मार्गावरील वाहतूक ठप्प होते. संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी त्रस्त वाहतूकदार तसेच स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

तीन वर्षांपासून काम रखडले, नागरिकांची गैरसोय
हे काम गेल्या ३ वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना वेगवेगळ्या समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पाणी साचते तर इतर दिवसात या भागात माेठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असते. त्यामुळे हे काम तत्काळ पूर्ण करुन कायमची ही समस्या साेडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...