आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक संरक्षण:पातोंडा पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक पवार अविरोध

पातोंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची नुकतीच निवड पार पडली. यात चेअरमनपदी अशोक प्रभाकर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नेहरू रामदास पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील महाजन यांनी संस्थेच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत सर्व संचालकांनी अशोक प्रभाकर पवार यांच्या नावाला संमती दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील महाजन यांनी ही निवडणूक बिनविरोध घोषित केली.

या वेळी व्हॉइस चेअरमन रवींद्र पवार, संचालक नेहरू पवार, माजी चेअरमन शिवाजी पवार, रघुनाथ चौधरी, संचालक भीमराव पवार, मगन बोरसे, चुडामन संदानशिव, प्रल्हाद पाटील, बापू बिरारी, संचालक विनोद पवार उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन अशोक पवार यांच्या विकास सोसायटी चेअरमन सुनील पवार यांनी सत्कार केला. तर मावळते चेअरमन नेहरू पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते संदीपराव पवार यांनी सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व संचालकांनी नूतन चेअरमन यांचा सत्कार केला. सेक्रेटरी श्रीराम पवार व हेमंत देशमुख यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...