आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:अधिसभा निवडणूक; 285 इच्छुकांचे अर्ज

प्रजळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी शेवटची तारीख होती. या निवडणुकीसाठी २८५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

शनिवारी सायंकाळी छाननी झालेल्या वैध व अवैध उमेदवारी अर्जांची यादी जाहीर केली जाईल. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिसभेसाठी महाविद्यालयीन अध्यापकांमधून १० जागा निवडून द्यावयाच्या आहेत. दोन दिवसांत ७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विद्यापीठ अध्यापकांमधून तीन जागांसाठी दोन दिवसांत नऊ अर्ज दाखल झाले. प्राचार्यांतून १० जागा निवडून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...