आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी, कापूस जप्त‎:बोळे येथे कापूस चाेरून पळणाऱ्या‎ दाेघांना शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले‎

पाराेळा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बाेळे येथील शेतातून‎ पाेत्यात भरलेला कापूस चाेरून‎ दुचाकीवरून पळ काढणाऱ्या‎ दाेघांना शेतकऱ्यांनी पाठलाग करून‎ पकडले. दाेघांना येथे पाेलिस‎ ठाण्यात आणून त्यांना पाेलिसांनी‎ रितसर अटक केली.‎ तालुक्यातील बोळे येथील‎ शेतकरी रामसिंग आधार गिरासे‎ (वय ४०) यांनी त्यांच्या शेतात‎ कापूस वेचून मोठ्या पोत्यांमध्ये‎ भरून तेथेच ठेवले होते. ते घरी‎ नेण्याकरता छोटा टेम्पो‎ आणण्यासाठी ते गावात येऊन टेम्पो‎ घेऊन शेतात गेले. तेव्हा कापसाच्या‎ पाेत्यांपैकी २ मोठे पाेते दिसले नाही.‎ परंतु मोटारसायकलवरून दोन इसम‎ शेताजवळून पाेते घेऊन जाताना‎ त्यांनी पाहिले होते.

त्यामुळे त्यांनीच‎ आपल्या शेतातून कापसाचे पाेते‎ चोरल्याचा दाट संशय आल्याने‎ सोबतच्या शेतकऱ्यांच्या मदतीने‎ चोरट्यांचा मोटारसायकलवरून‎ सुमारे १५ कि.मी. अर्थात सिंदी‎ कोळगावपर्यंत पाठलाग केला.‎ हिरोहोंडा शाईन (क्र.एमएम १८‎ बीव्ही २७६३) मोटारसायकल व‎ सुमारे ५० किलो कापसाच्या‎ पाेत्यासह दाेघांना रंगेहाथ पकडले.‎

पाेत्यात ४७५० रुपयांचा कापूस‎ हाेता. विशाल नामदेव पवार (वय‎ ३३) व रवींद्र नगराज कोळी (वय‎ ३१) रा.शिरूड, ता.जि. धुळे यांना‎ रंगेहाथ पकडले. पोलिसांना‎ कळवल्याने तेही तत्काळ पोहाेचले.‎ मोटारसायकल, चाेरलेला कापूस व‎ दोन्ही चोरट्यांना पारोळा पोलिस‎ ठाण्यात आणले. शेतकऱ्यांच्या‎ फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.‎ चोरलेल्या कापसाच्या दाेन‎ पाेत्यांपैकी एक पाेते जप्त केले. दुसरे‎ पाेते काेठे लपवून ठेवले, याबाबत‎ दोन्ही संशयितांची चाैकशी सुरू‎ आहे. त्यातून कापूस चोरीचे‎ आणखी काही गुन्हे उघडकीस‎ येण्याची शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...