आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पुष्परचना प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. एल. चौधरी, प्रा.डॉ. आर. एम. बागुल, प्रा.डॉ. पी. एन. सौदागर व डॉ. जे. जी. पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. पी. एन. सौदागर यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. सूर्यवंशी व उपप्राचार्य प्रा.डॉ. चौधरी यांनी पुष्प रचनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विभाग प्रमुख डॉ. बागुल यांनी पुष्परचना या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक व्यवसाय दृष्टीकोन तयार व्हावा व विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडल्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी असे कौशल्य विकासपर उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे सांगितले. या स्पर्धेत एकूण ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
पुष्परचना प्रदर्शनात विद्यार्थ्यानी टाकाऊ आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून मोगरा, झेंडू, शेवंती, गुलाब, जास्वंद, जरबेरा, चांदणी, विद्या, मका, जुनिपेरस, जास्वंद या फुले व पाने तसेच बांबू व परिसरातील उपलब्ध वनस्पतींचा वापर करून बनवलेले आकर्षक पुष्पगुच्छ आणि त्याचे विविध प्रकार प्रदर्शनात ठेवले होते. परीक्षक म्हणून डॉ. एच. जी. सदाफुले व डॉ. जे. जी. पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. पी. एन. सौदागर यांनी तर डॉ. जे. जी. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास आर. व्ही. पाटील यांनी सहकार्य केले. या वेळी विद्यार्थ्यांची माेठी उपस्थिती हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.