आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:तरुणीचे हातपाय बांधून घरामध्ये चोरीचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात दोन अज्ञात संशयितांवर गुन्हा

धरणगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कमलानगर भागातील एका घरात २१ वर्षीय तरुणीचे हात पाय दोरीने बांधून, दोन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसांच दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात शुभांगी विश्वास सावंत (वय २१, रा. चमगाव, ता. धरणगाव, ह.मु. कमलनगर) या तरुणीने फिर्याद दिली. ५ जूनला दुपारी ती घरी एकटी होती. त्यावेळी तोंड बांधलेले दोन संशयित चोरीच्या उद्देशाने घरात घुसले. यावेळी शुभांगीच्या डोक्यावर झाडूने मारुन, संशयितांनी तोंडात फडक्याचा बोळा कोंबला. घरातील दोरीने संशयितांनी शुभांगीचे हात व पाय बांधले. त्यानंतर कपाट उघडून चोरट्यांनी शोधाशोध केली. मात्र, त्यांना मुद्देमाल न मिळालेल्याने संशयितांनी शुभांगीला धमकावत पैसे व सोने कुठे आहे? अशी विचारणा केली. रस्त्याने जाणाऱ्या वाहनाचा आवाज आल्याने चोरटे पसार झाले.

बातम्या आणखी आहेत...