आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच जणांवर गुन्हा दाखल:मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; ५ संशयित ताब्यात

पाचोरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवंत व्यक्तीस मृत घोषित करुन बनावट दाखले तयार करून वेगवेगळ्या आश्रमांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील सर्व पाच ही जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.तालुक्यातील आंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रम, श्री कृष्ण मंदिर, जामनेर तालुक्यातील शहापूर महानुभाव आश्रम व भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील महानुभाव आश्रम तसेच इतर स्थावर मालमत्ता ही रविराज मुकुंदराज येळमकर यांच्या मालकीची आहे.

ही मालमत्ता भातखंडे येथील साधक, शिष्य मोहन येळमकर यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्युपत्र बनवून स्वताच्या नावे करुन घेतल्याबद्दल रविराज मुकुंदराज येळमकर यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्युपत्र बनवून मौजे आंबेवडगाव शिवार (शेत गट नं ९८ व ९४/२ वरील) पारीमांडल्य महानुभाव आश्रम व मंदार, शहापूर शिवारात (गट नं. ५४८/१ ) महानुभाव आश्रम तसेच भातखंडे बुद्रुक शिवारात (गट नं ६४) महानुभाव आश्रम या मुकुंदराज येळमकर यांच्या मिळकतीची प्रॉपर्टी मोहन येळमकर यांनी स्वताच्या नावावर करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते २ जुलै २०२२ दरम्यान फसवणूक केल्याचा कट उघडकीस आला आहे. याबाबत आंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रमाचे महंत रविराज मुकुंदराज यांच्या फिर्यादीवरून मोहन येळमकर (भातखंडे), विजय माधवराव बांधकर (रा. मनसर, जिल्हा नागपूर), संतोष शेणफडू बडगुजर (वरसाडे), विनोद जयकृष्ण दर्यापूरकर (रा. करनवाडी, जिल्हा यवतमाळ) व नितीन पंडित कुलकर्णी (रा. भवानी नगर, पाचोरा) यांच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...