आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहन:प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आत्मदहनाचा केला प्रयत्न

जळगाव/कजगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कारवाई न झाल्याने भडगाव तालुक्यातील कजगाव येथील युवकाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. भूषण नामदेव पाटील (रा. कजगाव, ता.भडगाव) असे त्या युवकाचे नाव आहे. २७ एप्रिल रोजी त्याने कजगाव येथील अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडे अर्ज दिला होता.

कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ४ जुलै रोजीच्या निवेदनाद्वारे दिला होता. त्यावेळीही आत्मदहनाच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी त्यावेळी लेखी पत्र दिले होते. त्यानंतरही अतिक्रमण काढण्यात आले नाही. त्याने मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक यांचीही भेट घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...