आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेठडी:पारोळा बसस्थानकात चोरीचा प्रयत्न; दोन महिलांना काेठडी

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीतील गर्दीला लाभ उठवत बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे पैसे चाेरीचा प्रयत्न करणाऱ्या दाेन महिलांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पारोळा येथील बसस्थानकात अमळनेर जाणाऱ्या बसमध्ये कविता जडे दुपारी २ वाजेच्या सुमारास बसत असताना गर्दीचा लाभ उठवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले रोख ६ हजार रुपये चोरुन नेले हाेते. या प्रकरणी बसस्थानकावरील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर दाेन महिलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते.

दरम्यान, श्रीरामपूर येथील शोभा प्रकाश खंदारे (वय ५५) व नंदा संजू सकट (वय ४२) असे दाेन्ही महिलांनी नावे सांगितली. या दाेघांना न्यायाधीश के. के. माने यांच्या समाेर हजर केले असता दाेन्ही महिलांना त्यांनी दोन दिवस पोलिस काेठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल नाना पवार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...