आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानातेवाइकांच्या नावे ठराव करून तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी जागा वाटून घेतल्याचे आरोप ६ वर्षांपूर्वीपासून होत आले आहेत. याविरोधात जामनेर न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे. असे असताना न्यायप्रविष्ट जागेवर गाळे बांधण्याचा प्रयत्न शुक्रवारी विद्यमान सदस्यांसह काही माजी सदस्य व नागरिकांनी हाणून पाडला. त्यामुळे जागांचा हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
फत्तेपूर येथील तत्कालीन सदस्य, ग्राम-सेवकांनी अखेरच्या कार्यकाळात लाखो रूपये किमतीच्या जागा केवळ तीस हजार रूपये अनामतीवर नातेवाइकांच्या नावे गुपचूप ठराव करवून घेतला आहे. याबाबत त्याचवेळी आरोप-प्रत्यारोप झाले होते. तर याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली होती. त्याचबरोबर जामनेर न्यायालयातही दावा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर गेली सहा वर्षे याबाबत कुठल्याही हालचाली झाल्या नसल्या तरी शुक्रवारी अचानक नदीपात्रात आखणी करून आरसीसीसाठी खड्डे खोदण्यात आल्याचे काहि नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील नागरिकांनी यास विरोध करून खड्डे बुजवून टाकले. तर या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचा प्रयत्न होत असेल तर संपूर्ण आठवडे बाजार परिसरात जागा सांभाळून दुकाने बांधण्याच्या तयारीत काही तरूण लागले हाेते. यामुळे ग्रामपंचायतीसमोर चांगलाच गदारोळ होऊन अखेर नागरिकांनी खड्डे बुजवले.
मला माहित नाही, नियमानुसार निर्णय घेणार
मला या प्रकाराबाबत काहिही माहिती नाही. अचानक माझ्यासमोर आज हा प्रकार आला. मी बांधकामासाठी कुठलीही परवानगी दिलेली नाही. नागरिकांच्या तक्रारी पाहता याबाबत सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. नियमानुसारच निर्णय घेतला जाईल.
सुरेश पाटील, ग्रामविकास अधिकारी, फत्तेपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.