आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याचा सल्ला:गारठ्यामुळे सध्या फ्रीजमधील फळे, अन्न टाळा ; खोकल्याच्या 200 रुग्णांवर उपचार

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी संपताच थंडीचा जोर जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचे तापमान १६ ते १८ अंशापर्यंत खाली आले आहे. ग्रामीण रुग्णालय व पालिका रुग्णालयात तीन दिवसांत २०० पेक्षा अधिक रुग्ण सर्दी, खोकल्याचे होते. तर १७० बालकेही सर्दी, व्हायरल इन्फेकशनने बेजार झाल्याचे दिसून आले. या वातावरणात फ्रीजमधील फळे, आईस्क्रीम टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पहाटे पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे नागरिक स्वेटर, कानटोपी, हातमोजे, जॅकेट घालून सकाळी फिरायला जाताना दिसत आहेत. सध्या शाळा बंद असल्या तरी मुले शिकवणीला जाताना स्वेटर घालत आहेत.

उबदार कपड्यांना मागणी वाढली थंडीच्या काळात उबदार कपड्यांना मागणी वाढते. याच पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी पाचपावली देवी मंदिराजवळ उबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी नागरिक स्वेटर, कानटोपी, हातमोजे, जॅकेट घेत असल्याचे माेठ्या प्रमाणात दिसून आले.

सकाळपासून रात्रीपर्यंत रुग्णालयात रांगा ऋतू बदलताच वातावरणातील गारवा वाढून सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. खासगी डॉक्टरांकडे सकाळी दहापासून रात्री उशिरापर्यंत तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. लहान मुले, वृद्धांना थंडीचा जास्त त्रास होतो. यामुळे त्यांना उबदार कपडे घालायला देणे, गरम अन्न देणे, सतत गरम पाणी पिण्यास देणे गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. थंडीची लाट सुरू झाल्याने बालके, वृद्धांची अधिक काळजी घ्यावी . त्यांना गरम अन्न द्यावे.

थंड अन्न खाणे टाळावे
फ्रिजमधील फळे, अन्न, आईस्क्रीम खाणे टाळायला हवे. अशा थंड वातावरणात उबदार कपड्यांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. सतत दोन दिवस ताप आल्यास तपासणी करावी - डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी

बातम्या आणखी आहेत...