आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी व कर्तव्य:महिला सदस्यांना जबाबदारीची जाणीव

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या १०० महिला सरपंच, उपसरपंच व सदस्यांना ३ ते ५ नोव्हेंबर या काळात पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा (ता.रावेर) येथील सेवाभावी संस्थेचे प्राचार्य अतुल महाजन, प्रशिक्षक भूषण लाडवंजारी, भैय्यासाहेब पाटील यांनी प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे, राजकुमार धस, सुनील पाटील उपस्थित होते.

या प्रशिक्षणात महिला सदस्यांची जबाबदारी व कर्तव्य, महिला ग्रामसभेचे महत्त्व, महिला वॉर्ड सभा, ग्रामपंचायतीच्या १ ते ३३ रजिस्टर बाबत सखोल माहिती, महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती, शाश्वत विकासाचे १७ ध्येय याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या दोन ते तीन महिला सदस्यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले.

पाचोरा येथील भडगाव रोडवरील अल्प बचत भवनात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास सरपंच स्वाती कुमावत, खेडगाव नंदीचे, ज्योती सोमवंशी, बाळद बुद्रुक, देवकाबाई परदेशी, गाळण, सविता विजयसिंग पाटील, मनिषा गणेश पाटील, माळसाबाई मोरे, मनिषा हाटकर, बेबाबाई श्रावण सोनार, अनिता बाविस्कर, विमल पाटील, शोभा गायकवाड, रेखा परदेशी, ललिता पाटील, सीमा पाटील यांच्यासह आखतवाडे, अंतुर्ली बुद्रूक प्र.पा., अंतुर्ली खुर्द प्र.लो.,आसनखेडे, बदरखे, अटलगव्हाण, खेडगाव नंदीचे, डांभुर्णी, बाळद बुद्रुक, बांबरूड राणीचे, बांबरूड महादेवाचे, खाजोळे, दिघी, गोराडखेडा बुद्रुक, गोराडखेडा खुर्द, हनुमान वाडी, कोल्हे, भोकरी, लोहारा, लोहारी, लोहटार, कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, दहिगाव, कुरंगी येथील महिला सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...