आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर मॉडेल:बहाळच्या 5 अंगणवाड्या सुपर मॉडेल ; अंगणवाडी केंद्रात दररोज केवळ चार तास बालक असतात

बहाळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी अधिक सक्षम व अद्यावत करण्यासाठी सुपर मॉडेल अंगणवाडी प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात तालुक्यातील बहाळ येथील पाच जुन्या अंगणवाड्याची दुरुस्ती करून अंगणवाडीची सुपर मॉडेल तयार करण्यासाठी रविवारी सकाळी गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी अंगणवाडीची पाहणी केली. या वेळी ग्राम विकास अधिकारी पंकज चव्हाण, सरपंच राजेंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य राकेश शिरुडे, असिफ मण्यार, कनिष्ठ अभियंता दिनेश मोरे, शिपाई बापू माळी, अमोल मोरे आदी उपस्थित होते. तालुक्यातील बहाळ मोठे गाव असून येथे सुरुवातीला सुपर मॉडेल अंगणवाड्या तयार करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी ‘दिव्य मराठी’ला या वेळी सांगितले. या उपक्रमाला पालक व बालकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे. अंगणवाडी केंद्रात दररोज केवळ चार तास बालक असतात. तर इतर २० तास ते पालकांसोबतच असतात. या सुपर मॉडेल अंगणवाड्या एका महिन्यात तयार करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...