आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक घटली:बहाळच्या लिंबूला मिळतोय २ हजारांचा भाव; उन्हाळ्यात मागणी वाढली, सुरत बाजारपेठेत मागणीत वाढ

बहाळ2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

गिरणा काठावरील बहाळ येथील लिंबू उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. सध्या बाजारात एका २० किलोच्या लिंबूच्या कॅरेटला २ हजार ते बावीसशे रुपये भाव मिळत आहेत. सध्या मालाची आवक कमी झाल्याने बाजारपेठेत लिंबूला तेजी आली आहे. एका किलोला १०० ते १२० रुपये भाव मिळत आहे. तर बाजारपेठेत सध्या लिंबू पाणीला मागणी वाढली आहे.

तापमान वाढीचा परिणाम झाल्याने लिंबू सरबतसह विविध पेयामध्ये लिंबूचा वापर वाढल्याने लिंबूची मागणी वाढली आहे. मात्र, मागील काही महिन्यात बहाळ परिसरातील लिंबूला ४५ ते ५० रुपये किलो भाव मिळत होता. दरम्यान, पातोंडा, गुढे, बहाळ, पोहरा, दस्केबडी, खेडगाव, कोळगाव, पथराड, नगरदेवळा, कजगाव आदी गावातून २० टन एवढाच लिंबू बाजारपेठेत नेला जात आहे. जानेवारी महिन्यात ३५ टन लिंबू परिसरातून बाजारपेठेत नेला जात होता. बहाळ परिसर लिंबूसाठी प्रसिद्ध असून हाच भाव कायमस्वरुपी असवा, अशी मागणी लिंबू उत्पादक करत आहेत. ज्यावेळी लिंबू बागांमध्ये मोठ्या प्रमाणात लिंबू होते. त्यावेळी १५० ते २०० रुपये कॅरेटने माल सूरत, चाळीसगाव बाजारपेठेत विकला गेला. त्यावेळी परिसरातून एका दिवसाला ६ ते ७ हजार कॅरेट लिंबू बाजारपेठेत नेला जात होता. मात्र, आता माल नसल्याने भाव वाढला आहे.

दाेन वर्षांनंतर सुरत बाजारपेठेत चांगला भाव : दोन वर्षानंतर प्रथमच सुरत बाजारपेठेत चांगल्या लिंबूला २२०० रुपये कॅरेट भाव मिळाल्याने उत्पादक समाधान व्यक्त करत आहे. सध्या सुरत बाजारपेठेत १ हजार ते १२०० कॅरेट एवढाच माल जात असल्याने जास्त भाव मिळत आहे. चारशे झाडांच्या बागेतून एका दिवसाला तीन ते चार कॅरेट लिंबू निघत आहे.

जास्त पाणी अन‌् रासायनिक खतांचा झाला परिमाण
लिंबूच्या बागांना पावसाळ्यात जास्त पाणी झाल्याने लिंबूवर डायबँक रोगाचा प्रादुर्भाव झाला हाेता. त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात शेंड्यापासून झाड सुकू लागल्याने व रासायनिक खतांचा अति वापर केल्याने लिंबूचे उत्पन्न कमी झाले आहे. लिंबूला फुलोरा लागला त्यावेळी बेमोसमी पाऊस, धुके व थंडीचा परिणाम झाल्याने झाडांवर लिंबूची संख्या कमी झाली.

बातम्या आणखी आहेत...