आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचा नामविस्तार दिन:बहिणाबाईं यांची कविता म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान ; वीरा राठोड यांचे प्रतिपादन

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार दिन व वर्धापन दिन हा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्ट्स एस.एम.ए. सायन्स अॅड के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर काॅलेज चाळीसगाव येथे साजरा करण्यात आला. बहिणाबाई चौधरी एक अनोखे व्यक्तिमत्व या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. वीरा राठोड यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा. विभा पाटील, प्रा. डॉ. अभय शेळके, प्रा. प्रभाकर पगार उपस्थित होते. प्रा. डॉ. वीरा राठोड यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वावर भाष्य केले. बहिणाबाई चौधरी यांचे लौकिक जीवन हे अतिशय कष्टदायी होते. या जगण्याच्या संघर्षातूनच त्यांचे काव्य फुलत गेले. त्यांची कविता म्हणजे जगण्याचा घेतलेला एक शोध आहे, तसेच ते जीवनाचे तत्वज्ञान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...