आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यवरांनी दिला गुरूंच्या आठवणींना उजाळा:पारोळ्यातील बालाजी प्रबोधीनीतर्फे आजी-माजी शिक्षकांचा झाला गौरव ; निवृत्त शिक्षक भारावले

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचालित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय, डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालय, एम. यु. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल व यु. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यरत शिक्षक व शहरातील निवृत्त शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु. एच. करोडपती तर प्रमुख पाहुणे म्हणून एम. एस. निकम, बी. एस. मिसर, स. ध. भावसार, जी. जे. भावसार, डि. के. पाटील, इ. एस. वाणी, प्रतिभा वाणी, व्ही. एम. जोशी, एल. एम. पाटील, पी. आर. वाणी, संचालिका मंगला करोडपती, सचिव डॉ. सचिन बडगुजर, संचालक सुनील बडगुजर, विशाल महाजन व अंजली पाटील आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील यांनी केले. यानंतर निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. धनेश पाठक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नगरसेविका अंजली पाटील यांनीही सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यानंतर सर्व शिक्षकांचा अध्यक्ष व मान्यवरांनी सत्कार केला. ई. एस. वाणी यांनी सीबीएससी शाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. एल. एम. पाटील, एम. एस. निकम यांनी मार्गदर्शन केले. स. ध.भावसार यांनी शिक्षक शब्दाचा अर्थ सांगितला. यु. एच. करोडपती यांनी विद्यार्थी चांगला कसा घडेल याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. डॉ. सचिन बडगुजर यांनी गुरूंच्या आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य विजय बडगुजर, दीपक भावसार यांनी मनोगत व्यक्त केले.

डाॅ. राधाकृष्णन यांच्या कार्याला ‘पंकज’च्या विद्यार्थ्यांतर्फे उजाळा
चोपडा येथील पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी डॉ. किशोर पाठक यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनाच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली. विद्यार्थी शुभम बाविस्कर व दीपक सूर्यवंशी यांनी ही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे यांनी गुरूचा महिमा विशद केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय पाटील यांनी तर प्रा. सुनील सुरवाडे यांनी आभार मानले. या वेळी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमास कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...