आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:बोहरे येथे मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल‎

पाडळसरे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ अमळनेर तालुक्यातील बोहरे येथे‎ जुन्या वादातून एकाला बेदम‎ मारहाण करून ठार मारण्याची‎ धमकी दिल्याप्रकरणी दोन‎ जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल‎ करण्यात आली आहे.‎ बोहरा येथील रामकृष्ण साहेबराव‎ धनगर व सुजित दिलीप कोळी‎ यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण‎ झाले होते.

त्यानंतर काल दुपारी‎ रामकृष्ण धनगर हे किराणा दुकानात‎ जात असताना सुजित कोळी व‎ त्यांचा भाचा आकाश कोळी (रा.‎ जळगाव) हे शिवीगाळ करू‎ लागले. त्याचा जाब विचारला‎ असता दोघांनी रामकृष्ण धनगर‎ यास चापट, बुक्क्यांनी तसेच‎ डोळ्याजवळ व तोंडावर कड्याने‎ मारहाण केली. या प्रकरणी मारवड‎ पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...