आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:निवृत्त जवानास मारहाण; दोषींवर कारवाई करावी

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शारदानगरातील रहिवासी निवृत्त जवान पंकज पाटील यांना, २ रोजी पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी मारहाण केली. त्यामुळे जवान पंकज पाटील जखमी झाले असून ते चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकाराबाबत आजी-माजी सैनिक संघटनेच्या प्रतिनिधींनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. तसेच दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी निवेदन दिले.

चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी, विनाकारण पोलिस स्टेशनला बोलावून जवान पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. संघटनेतर्फे अध्यक्ष कैलास जगताप, उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, सचिव संदीप बडगुजर, कोषाध्यक्ष सुभाष शिरसाट, संग्राम कोळी, कैलास महाजन, सदाशिव अहिरे, शरद धनगर, प्रभाकर माळी, सतीश पाटील, मनोज पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...