आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शेंदुर्णीत पर्यवेक्षकास मारहाण ; कृषी कर्मचाऱ्यांचे काळी फीत लावून काम

जामनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेंदुर्णी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्यासह त्यांच्या दोन पुत्रांनी कृषी पर्यवेक्षक कन्हैय्या महाजन यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जामनेर कृषी विभाग कर्मचाऱ्यांनी तहसीलदार अरूण शेवाळे यांना गुरुवारी निवेदन दिले. तर गुरूवारी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फित लावून कामकाज केले.

कृषी पर्यवेक्षक कन्हैय्या महाजन हे बुधवारी दुपारी गोविंद अग्रवाल यांच्या गोपाला जिनिंगमध्ये बोंडअळी नियंत्रणासाठीचे ट्रॅप लावण्यास गेले होते. ‘आमच्या खाजगी मालमत्तेत न विचारता का आलास’ अशी विचारणा करीत गोविंद अग्रवाल यांचेसह पूत्र नीलेश व नितीन या तिघांनी महाजन यांना शिवीगाळ करून मारहाण केली, अशी फिर्याद कन्हैय्या महाजन यांनी पहूर पोलिस ठाण्यात दिली.

त्यावरून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अग्रवाल पितापुत्रांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फित लावून कामकाज केले. तहसीलदार अरूण शेवाळे यांना निवेदन दिले. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...