आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:शेंदुर्णी येथील वाडी तलावाचे सुशोभिकरण

शेंदुर्णी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वाडी दरवाजा भागातील वाडी तलावाचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरणासाठी, शेंदुर्णी नगरपंचायतीला एक कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे.नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष नीलेश थोरात, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल व अमृत खलसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, अमृत दोन अभियानाअंतर्गत प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार कामासाठी निधी मंजूर झाला असून, १२ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे वर्षभरात शेंदुर्णीच्या सौंदर्य करण्यात भर टाकणारा हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव यांनी दिलेल्या तांत्रिक मान्यतेनुसार, राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यात तलाव खोलीकरण, कंपाउंड वॉल, चेंज लिंक, जल शुद्धीकरण, जॉगिंग ट्रॅक व फुटपाथ अशा कामांचा समावेश आहे. त्यामुळे वर्षभरात शेंदुर्णीकरांना या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडेल.

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती
शहरासाठी ६४ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रसिद्ध झाली असून, १८ महिन्यातच काम पूर्ण करण्याची मुदत आहे. नवीन योजनेत पाइपलाइन, जलकुंभ, एक्सप्रेस फिडर, जलशुद्धीकरण केंद्र व सव्वा कोटींचा सौर प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे वीज नसतानाही शेंदुर्णीचा पाणीपुरवठा पूर्ण दाबाने अखंड राहील. पाणी भरण्यासाठी पंप लावण्याची नागरिकांना गरज भासणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...