आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 100 वारसांना दिला डाक विम्याचा लाभ

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय असून या विषयावर एकत्रित रित्या काम करण्याची गरज आहे. उभारी विभागाचे याकडे विशेष लक्ष असणार आहे. १० हजार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ चालू हंगामात देण्याचे काम केले आहे. जे शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चोपड्यात दिली.

जिल्हा प्रशासन व चोपडा तालुका कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने, चोपडा शहरात सकाळी अकरा वाजता नगरपालिकेच्या नाट्यगृहात लोकसभागातून शेतकरी आत्महत्याग्रस्त १०० भगिनींना, डाक विभागाच्या अपघात विम्याचा लाभ देण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, कृती समितीचे समनव्यक एस. बी. पाटील, मुख्यधिकारी हेमंत निकम, यावल डाक विभागाचे भूषण सैंदाणे, जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील, हतनूरचे कार्यकारी अभियंता पी. बी. पाटील, पोस्ट मास्तर गोपाल सोनवणे, नायब तहसीलदार बांबळे, माजी नगरसेवक जीवन चौधरी, इनरव्हील क्लब च्या नीता अग्रवाल, माजी अध्यक्ष अश्विनी गुजराथी, डॉ. रवींद्र निकम, चंद्रशेखर पाटील, संजीव बाविस्कर, कांतीलाल पाटील, अजित पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना १०० वारसांना अपघात विम्याचे कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनगाेत व्यक्त केले.

प्रत्येकी १० लाखांचा विमा
कृती समितीमार्फत डाक विभागाच्या माध्यमातून, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १०० महिलांना प्रत्येकी १० लाखांचा अपघात विमा देण्यात आला.

एस.बी. पाटील यांना झाले अश्रू अनावर
चार वर्षापूर्वी कोल्हापूरला २५ लाखांची मदत दिली होती. एरवी कृती समिती रस्त्यावर आंदोलन करते, असे कार्यक्रम करत नाही. पण शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन माझ्या माय माऊलींना मदत व्हावी म्हणून आजचा कार्यक्रम हाती घेतला. या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते, असे सांगताना एस.बी.पाटील यांना अश्रू अनावर झाले.

बातम्या आणखी आहेत...