आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती‎:बेटावद बुद्रूकला श्री चक्रधर‎ स्वामी मंदिरात प्राणप्रतिष्ठा‎

रांजणी‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेटावद बुद्रूक येथे १२ रोजी श्री चक्रधर स्वामी दत्त मंदिर‎ जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना झाली. ग्रामविकास मंत्री‎ गिरीश महाजन यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.‎ मंदिर परिसरात आमदार निधीतून पाच हजार चौरस फुटांचा‎ सभामंडप बांधून देण्याची ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.‎ महिलांच्या सन्मानार्थ बोलताना मुलगा व मुलगी भेदभाव न‎ करता महिलांचा सन्मान करावा. महिला या पुरुषांपेक्षा दोन‎ पाऊल पुढे असून, महिलांना कमी लेखू नये.

महिलांचा सन्मान‎ करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी बेटावद बुद्रूक‎ आणि खुर्द, रांजणी, नांद्रा, हवेली, गोरनाळा व परिसरातील‎ नागरिक उपस्थित होते. नवल पाटील, माजी पं.स.सभापती‎ जे.के.चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्या बेबाबाई भुसारी,‎ अमोल जावडे, संदीप सरताडे, अशोक भोईटे, राजू अजमेरे,‎ राजू पाटील, विनोद सत्रे, नांद्रावली सरपंच संजू पाटील, मोहन‎ वाघ उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेटावद‎ बुद्रूक परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात पाच‎ हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.‎

बातम्या आणखी आहेत...